भारतात मुलींच्या लग्नाचं वय १८ वरून २१..
भारतातल्या मुलींच्या लग्नाचं वय १८ वरून २१ या वरील विषयाने बरीच चर्चा होताना दिसत आहे.कोणी या निर्णया विरोधात तर कोणी या निर्णयाच्या बाजूने मत व्यक्त करताना दिसत आहे.पण,माझ्या मते या विषयांवर बोलताना त्याला अनुसरून महत्वाच्या केंद्रित होणाऱ्या मुद्द्याकडे सर्वांनी लक्ष द्यायला हवं.तो म्हणजे यातून मुली व महिला यांच्या सध्याच्या स्थितीमधे नक्की कोणती सुधारणा होणार आहे का? नसेल तर ती काय असावी? या वर बोलण अपेक्षित आहे. तर या विषयाला अनुसरून मी काही मुद्दे मांडत आहे.अर्थात ते परिपूर्ण असतील अस नाही,पण माझ्या अनुभवावरून माझ्या बुद्धीला जे जोग्य वाटलं ते मी इथे मांडत आहे.त्याचा विचार जरूर व्हावा. हा जो मुलींच्या लग्नाचे वय १८ वरून २१ करण्यासाठी जो प्रयत्न केंद्रातून होत आहे त्याचे स्वागत करावें का विरोध हे समजेना.आम्ही काही तरी करून दाखवत आहोत या अविर्भावात जर केंद्र असेल तर त्यांना कोणी तरी सांगावं याने मूळ व्यवस्थेत काही बदला होत नाही,तर हा केवळ वरवर केलेला बदल आहे. मूळ मुद्दा ते कसा हाताळणार? लग्नाचं वय वाढवल्याने मुलींना शिक्षण घेता...